MPSC Group C Recruitment: एमपीएससी कडून 900 पदांवरील नोकरभरतीसाठी अर्ज करण्याला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

पूर्वी 17 जानेवारी असलेली अंतिम मुदत आता वाढवून 31 जानेवारी करण्यात आली आहे.

MPSC logo (Photo Credits: Website)

एमपीएससी कडून MPSC Group C Recruitment ला अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वी 17 जानेवारी असलेली अंतिम मुदत आता वाढवून 31 जानेवारी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही या नोकरभरतीसाठी उत्सुक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. दरम्यान उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी MPSC ची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in ला भेट द्यावी लागणार आहे.

दरम्यान अर्ज सादर केल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यासाठी 2 फेब्रुवारी 2022 पर्यंत वेळ असणार आहे. याकरिता प्रिलिम्स परीक्षा या 3 एप्रिल दिवशी होणार आहेत तर मुख्य परीक्षा 6 ऑगस्ट 2022 दिवशी होणार आहे. मग ज्यांना या सरकारी नोकरीमध्ये सामिल होण्याची इच्छा आहे त्यांनी खालील स्टेप्स फॉलो करत अर्ज सादर करणं आवश्यक आहे. UPSC ESE Prelims Exam 2022 ची तारीख जाहीर; upsc.gov.in वर पाहा वेळापत्रक .

MPSC Group C Recruitment कसा कराल अर्ज?

या नोकरभरती मध्ये इंडस्ट्री इन्सपेक्टर साठी 103 जागा, डेप्युटी इन्सपेक्टर साठी 114 जागा, टेक्निकल असिस्टंट साठी 14 जागा, टॅक्स असिस्टंट साठी 117 जागा, मराठी क्लार्क-टायपिस्ट साठी 473 जागा तर क्लार्क-टायपिस्ट इंग्रजी साठी 79 जागांवर नोकरभरती होणार आहे. दरम्यान 22 डिसेंबर 2021 पासून यासाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.