IPL Auction 2025 Live

MPSC Exams 2020 Revised Time Table: राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबरला; mpsc.gov.in वर पहा नवं वेळपत्रक!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा (Rajya Seva Purva Pariksha 2020) 13 सप्टेंबर दिवशी तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 दिवशी होणार आहे.

Exam Dates| Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

MPSC Exams  2020 Revised Dates:  महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुनश्च हरिओम म्हणट काही व्यवहार सुरू झाले आहे. अशामध्ये महाराष्ट्रात प्रशासकीय विभागांमध्ये काम करू इच्छिणार्‍या तरूणांच्या एमपीएससीच्या परीक्षा (MPSC Exams) देखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आज  त्याच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा (Rajya Seva Purva Pariksha 2020) 13 सप्टेंबर दिवशी तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 दिवशी होणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी युपीएससीने देखील त्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याच धर्तीवर आता राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामिण भागातून शहराकडे अनेक विद्यार्थी एमपीएससी आणि युपीएससीच्या तयारीसाठी येतात. मत्र कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे अनेकांनी पुन्हा आपापल्या घरी जाण्याचा मार्ग स्वीकारला होता. मात्र आता परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर झाल्याने त्यांचा पुन्हा जोमाने अभ्यास सुरू होईल. इथे पहा सुधारित वेळापत्रक .

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, नायब-तहसीलदार, गट-विकास अधिकारी इत्यादी वर्ग-1, वर्ग-2 व वर्ग-3 ची पदे भरली जातात. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षांमध्ये आपलं नशीब आजमावत असतात. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमधून उमेदवाराची चाचपणी केली जाते त्यानंतर अंतिम निवड जाहीर होते. वयाची 19 वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो.

दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात यापूर्वी या परीक्षा होणं नियोजित होते. मात्र कोरोना संकटात त्या लांबणीवर पडल्या होत्या. कोव्हिड 19 या जागतिक आरोग्य संकटाचा मागील काही महिन्यात अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे. दरम्यान देशातील अनेक कॉलेज आणि शाळांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा, महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा देखील लांबणीवर पडल्या आहेत. आता जसा कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत तशी पुन्हा आर्थिक, शैक्षणिक घडी बसवण्याचं काम सुरू झालं आहे.