MPSC Exam: राज्य सेवा पूर्व परीक्षा - 2020 आता 20 सप्टेंबरला होणार- महाराष्ट्र लोकसेवा आयोग
त्यामुळे ही परीक्ष आता 20 सप्टेंबर 2020 या दिवशी होईल.
राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) आता परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा केली आहे. राज्य लोकसेवा परीक्षा आणि नीट परीक्षा (NEET Exam) एकाच तारखेस येत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आणि परीक्षेच्या नव्या तारखेची घोषणा एमपीएससीने एका पत्रकाद्वारे केली. एमपीएससीने हे पत्रक 12 ऑगस्टला काढले आहे.
एमपीएससीने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, नियोजीत वेळे प्रमाणे 13 सप्टेंबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा - 2020 पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्ष आता 20 सप्टेंबर 2020 या दिवशी होईल. दरम्यान, एमपीएससीने जारी केलेले राज्य सेवा पूर्व परीक्षा - 2020 बाबतचे नवे वेळापत्रक पाहायचे असेल तर ते एमपीएससीच्या www.mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (हेही वाचा, MPSC Exam: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या)
दरम्यान, कोरोना व्हायरस संसर्गाची भीती विचारात घेऊन या आधी राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तीन वेळा घेतला आहे. त्यामुळे स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक एमपीएससीने 17 जून रोजी जाहीर केले. त्यानुसार पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा एक नोव्हेंबर अशा क्रमाने पार पडणार होत्या. मात्र, 13 सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात नीट परीक्षा येत्या 13 सप्टेंबरला पार पडत आहेत. परिणामी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेणे टाळण्यासाठी एमपीएससीने आपल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.