MPSC Exam: लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षेची सुधारित वेळापत्रक जाहीर; नवीन तारीख घ्या पाहून

लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्या तारखेनुसार महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 2024 ची परीक्षा शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक(Revised schedule)जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, आता नव्या तारखेनुसार महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा(MPSC Exam)2024 साठीची परीक्षा शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही परिक्षा पुढ ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. ज्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती. (हेही वाचा:MPSC Exam Postponed: लोकसभा निवडणूकीमुळे 'एमपीएससीच्या' परिक्षा लांबणीवर, आयोगाकडून माहिती )

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी २९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यात 274पदांसाठी 28 एप्रिल 2024 रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र आयोगाकडून आता नव्याने वेळापत्रख जाहीर करण्यात आले आहे. आयोगाने 21 मार्च 2024 रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानुसार आता शनिवार, दि. 6 जुलै 2024 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

09 मे, 2024 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते दिनांक 24 मे, 2024 रोजी 11 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची मुदत 26 मे, 2024 रोजी 11 पर्यंत आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 27 मे, 2024 रोजी पर्यंत आहे.

पदे व संख्या:

(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे)

(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे)

(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे)

(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे)

(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे)

(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे)

(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे)

(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद)

(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 19 पदे)

(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे)

(11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे)

(12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे)

(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे)

(14) सरकारी कामगार अधिकारी, गट – ब (एकूण 04 पदे)

(15) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04 पदे)

(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7 पदे)

(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52 पदे)

(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(2) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे)

(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)

(3 ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)

(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे)

(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement