MPSC Exam Postpone: एमपीएससी नंतर आता NEET, JEE परीक्षाही पुढे ढकलण्याची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची मागणी
तेव्हा आम्ही परीक्षा घेऊ शकलो नाहीत. तर आता रुग्णांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर परीक्षा कशा काय घेतल्या जाऊ शकतात, असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा राज्यात वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ( MPSC Exam Postpone) पुढे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी तसे जाहीरही केले. राज्य सरकारच्या या निर्णयाचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी जोरदार स्वागत केले आहे. तसेच, राज्याप्रमाने आता केंद्र सरकारनेही NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे.
करोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात कमी होती. तेव्हा आम्ही परीक्षा घेऊ शकलो नाहीत. तर आता रुग्णांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर परीक्षा कशा काय घेतल्या जाऊ शकतात, असा सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, जेईई आणि नीट परीक्षांसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, देशातील बहुतांश राज्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात असे म्हटले आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते, विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर आणि अभ्यासकांनीही जेईई परीक्षा पुढे ढकलाव्यात असे म्हटले आहे. कोरोना व्हायरस संसर्गाची भीती असताना शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात घालू नये, अशी भावना अनेक पालकही व्यक्त करताना दिसत आहेत.
राज्याच्या राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित एकूण रुग्णांची संख्या आता 7,18,711 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झालेल्या आणि रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या 5,22,427 आणि रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 1,72,873 जाणांचाही समावेश आहे. (हेही वाचा, MPSC Exam 2020: कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार)
दरम्यान, देशातील एकूण कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या संख्येबाबत बोलायचे तर, देशातील कोरना रुग्णांची एकूण संख्या 3234475 इतकी आहे. त्यापैकी प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 707267 इतकी आहे. तर आतापर्यंत 2467759 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आणि 59449 जणांचा मृत्यू झाला आहे.