MPSC Appointment: राज्यसेवा परीक्षा 2019 उत्तीर्ण 413 उमेदवारांना नियुक्ती; राज्य सरकारच्या आदेशानुसार 17 जानेवारीपासून प्रशिक्षण
जे उमेदवार राज्यसेवा आयोगाची परीक्षा 2019 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्या उमेदवारांना राज्य सरकारच्या सेवेत रुजू करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आदेश काढले आहेत.
MPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे उमेदवार राज्यसेवा आयोगाची परीक्षा 2019 मध्ये उत्तीर्ण झाले आहेत त्या उमेदवारांना राज्य सरकारच्या सेवेत रुजू करुन घेतले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आदेश काढले आहेत. या आदेशानुसार नियुत्त निघालेल्या (MPSC Appointment) उमेदवारांचे येत्या 17 जानेरवारीपासून प्रशिक्षण सुरु होणार आहे. त्यामुळे एमपीएसी उत्तीर्ण (2019) उमेदवारांसाठी येणारे 2022 हे वर्ष 'अच्छे दिन' घेऊन येणार असल्याचे दिसते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2019 सालची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी नियुक्ती मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्षे उलटून गेली तरीही नियुत्ती मिळाली नसल्याने हे उमेदवार जोरदार आक्रमक झाले होते. काही उमेदवारांनी तर आत्मदहनाचा इशारा दिला होता. 2019 मध्ये झालेल्या परीक्षेचा सुधारीत निकाल 28 सप्टेंबर 2021 या दिवशी जाहीर झाला होता. 413 पदांचा समावेश होता. ही पदे उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा पातळीवरची होती. (हेही वाचा, MPSC State Service Prelims Exam Admit Card 2021: 2 जानेवारीला होणार्या राज्य सेवा पूर्व परीक्षा ची अॅडमीड कार्ड्स जारी; mpsconline.gov.in वरून अशी करा डाऊनलोड)
एका बाजूला कोरोना स्थिती आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड आर्थिक कोंडी अशा कात्रीत सरकार अडकले आहे. त्यामुळे नियुक्त्या लांबत होत्या. यावरुन राजकीय पक्ष सरकारला लक्ष्य करत होते. राज्यात अनेक गंभीर स्वरुपाचे प्रश्न असताना राज्य सरकार कोणताच निर्णय घेत नाही. त्यामुळे नियुक्त्या लांबत असल्याची टीका सर्वस्तरातून होत होती. दरम्यान, नियुक्तीचा निर्णय घेत राज्य सरकारने सर्वांनाच दिलासा दिला आहे.