Satara News: खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमनेसामने; सातारा येथे तणाव
त्यामुळे दोन्ही राजांचे समर्थक एकमेकांसमोर आले. सातारा पोलिसांनी मोठ्या शथापीने परिस्थिती हाताळली.
खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Raje Bhosale) सातारा (Satara) येथे आज (21 जून) पुन्हा एकदा आमनेसामने आले. त्यामुळे दोन्ही राजांचे समर्थक एकमेकांसमोर आले. सातारा पोलिसांनी मोठ्या शथापीने परिस्थिती हाताळली. त्यामुळे संघर्ष तुर्तास टळला. मात्र, शहरातील सत्ताकेंद्री दोन्ही नेतृत्वं आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. बाजार समितीच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम हे या संघर्षाचे मूळ कारण ठरला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ वातावरणात तणाव स्पष्ट जाणवत होता. दरम्यान, उदयनराजे यांच्या विरोधाला न जुमानता पोलिसांसमोरच शिवेंद्र राजे यांनी नियोजीत भूमिपूजन केल्याचे समजते.
उदयनराजे भोसले हे राज्यसभेवरील खासदार आहेत. तर शिवेंद्रराजे भोसले हे आमदार. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही राजे एकाच पक्षात आहेत. असे असले तरी स्थानिक पातळीवर मात्र ते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यातूनच दोघांमध्ये अनेकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. काही काळापूर्वीच बाजारसमिती निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवेंद्रराजे यांच्या गटाचा विजय झाला. तर उदयनराजे भोसले यांच्या गटाचा पराभव झाला. त्यातूनही हा संघर्ष अधिक तीव्र झाला. (हेही वाचा, NCP Leader Ghar Wapsi From BRS: KCR यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर डल्ला, अनिल देशमुख यांच्यामुळे तीन दिवसांत 'घरवापसी')
ट्विट
दरम्यान, बाजार समितीच्या जागेवर व्यापारी संकुल बांधण्यासाठी आयोजित कार्यक्रमासाठी नियोजित ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यांनी संबंधित जागेवर असलेले पत्र्याचे शेडही हटवले. दरम्यान, पुढच्या काहीच वेळात शिवेंद्र राजे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह तिथे आले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.