सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि कोहली यांच्या समर्थनात उतरल्या खासदार नवनीत राणा, विरोधकांना दिले सडेतोड उत्तर
अशातच आता खासदार नवनीत राणा यांनी या स्थितीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली यांच्यासह अन्य कलाकांनी केलेल्या ट्विटवरुन सध्या वातावरण तापले आहे. अशातच आता खासदार नवनीत राणा यांनी या स्थितीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी असे म्हटले की, एखाद्याला राष्ट्राचे नायक असल्याचे सत्य करुन दाखवण्याची गरज नाही आहे की, ते राष्ट्राच्या बाजूने आहेत किंवा त्याच्या विरोधात आहेत. ही एक लोकशाही असून तेथे कोणीही स्वत:चे मत मांडू शकतो. परंतु जर कोणी एखाद्याच्या ट्विट वरुन या कलाकारांना पारखत असेल तर ते भारत विरोधी आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि विराट कोहली यांच्यासह अन्य कलाकारांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील ट्विट बद्दल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकारच्या दबावात त्यांनी ट्विट तर केले नाही ना याचा तपास महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला करायचा आहे असे बोलले जात आहे.(Anil Deshmukh on Celebrity Tweets Investigation: भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्यासाठी सन्माननीय पण..; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खुलासा)
Tweet:
दरम्यान, राज्य सरकारने ही कारवाई काँग्रेसच्या तक्रारीनंतर सुरु केली आहे. काँग्रेसच्या प्रतिनिधीमंडळाने अनिल देशमुख यांच्यासोबत ऑनलाईन बातचीत केली. त्यावेळी त्यांनी असे म्हटले की, रिहाना हिच्या ट्विट नंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहलीसह अन्य काही कलाकारांच्या ट्विटमध्ये काही शब्दांचे साधर्म्य दिसून आले.