Thane: आनंद नगर परिसरात ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर चालत्या कारला आग (See Pic)

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Moving car catches fire in Thane (Photo Credits: ANI)

ठाण्यातील (Thane) आनंदनगर (Anand Nagar) परिसरात ईस्टर्न एक्स्प्रेस वे (Eastern Expressway) वर एका चालत्या गाडीला आग लागल्याच्या घटना समोर येत आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या दुर्घटनाचा फोटोही एएनआयने ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे. या फोटोत असे दिसून येत आहे की, अग्निशमन दलाचे जवान गाडीला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. बोरीवलीला जाणाऱ्या ईस्टर्न एक्स्प्रेस वे जवळ आनंद नगर परिसर आहे. (मुंबई: सानपाडा नजीक सायन-पनवेल महामार्गावर लक्झरी बस आगीत जळून खाक. Watch Video)

गाडीला आग लागण्यापूर्वीच गाडीतील प्रवासी सुखरुप बाहेर आले. त्यामुळे जिवीतहानी टळली असली तरी रस्त्यावर आग लागलेली गाडी पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरु केले. मात्र गाडीला आग का लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Nagpur: चिकन फ्राय बनवून देण्यास नकार दिला म्हणून मद्यपींनी चक्क हॉटेललाच लावली आग)

ANI Tweet:

डिसेंबर 2020 मध्ये अशाच प्रकराची घटना ठाण्यातूनच समोर आली होती. इस्टर्न एक्स्प्रेस वे जवळ संध्याकाळी 8.30 वाजता एका चालू गाडीला अचानक आग लागली होती. यावेळी गाडी चालक सुखरुप गाडीबाहेर आला होता आणि अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी पोहचून आग विझवली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif