महाराष्ट्र: जम्मू-काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या CPRI चे जवान नरेश बडोले यांचे पार्थिव नागपूरात दाखल
त्यांचे पार्थिव आज त्यांच्या नागपूरातील राहत्या घरी आणण्यात आले आहे. त्यांचे पार्थिव पाहून त्यांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याची कारवाई सुरु असून काल (24 सप्टेंबर) काश्मीरच्या बडगाम (Badgam) जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात वीरमरण आलेले सीपीएफआरचे अधिकारी नरेश बडोले (CPRF ASI Naresh Badole) शहीद झाले. त्यांचे पार्थिव आज त्यांच्या नागपूरातील राहत्या घरी आणण्यात आले आहे. त्यांचे पार्थिव पाहून त्यांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या परिसरात शोककळा पसरली असून आज शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शहीद जवान नरेश बडोले हे केंद्रीय राज्य राखीव दलाच्या (सीआरपीएफ) ११७ बटालियनमध्ये ते कार्यरत होते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बंदिपोरा परिसरात काल पहाटे साडे सात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला. गोळीबारात नरेश बडोले गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी नरेश बडोले यांची रायफल घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला. नरेश बडोले यांना तात्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं. जम्मू-काश्मीर: पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रे, दारूगोळा यांची तस्करीचा प्रयत्न BSF ने उधळून लावला, 58 अमली पदार्थांची पाकिटेही केली जप्त
त्यांच्या पार्थिवावर आज नागपूरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील अरनिया भागात शस्त्रे (Arms) , दारूगोळा (Ammunition) यांची तस्करीचा प्रयत्न BSF ने उधळून लावला. शनिवारी (19 सप्टेंबर) रात्री BSF जवानांनी ही कारवाई केली असून यात शस्त्रे, दारुगोळा आणि अमली पदार्थांची (Drugs) पाकिटे हस्तगत करण्यात आली आहे.
BSF ने केलेल्या या कारवाईत 2 पिस्तुल्स, 4 दारूगोळा, 58 अमली पदार्थांची पाकिटे जप्त करण्यात आली आहे. नारकोटिक्स विभागाने ही माहिती दिली आहे.