Monsoon Updates 2020: महाराष्ट्रात येत्या 2-3 जुलै पासून मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज

कारण जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखाले होते. राज्यात येत्या 2-3 जुलै रोजी मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Monsoon 2020 | Image used for representational purpose only | (Photo Credits: IANS)

उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखाले होते. राज्यात येत्या 2-3  जुलै रोजी मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांच्यातर्फे देण्यात आली आहे. यापूर्वी 28 जून पासून सुद्धा मुंबई व उपनगरात पाऊस होईल असे अंदाज वर्तवण्यात आले होते, मात्र अद्याप अनेक ठिकाणी पाऊस अनुपस्थितच आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 2-3 जुलै पासून मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याने मुसळधार पाऊस पडणार आहे. पावसाने राज्यात पुन्हा एकदा आगमन केले असले तरी, पावसाची यंदाची कामगिरी तितकीशी समाधानकारक नाही. त्यामुळे नैसर्गिक पावसाच्या भरवशावर न राहता एकदा कृत्रिम पावसाचा प्रयोग करुन पाहू असा राज्य सरकारचा विचार आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला जाण्याची शक्यता आहे. (Monsoon Updates: वरुणराजा परतला, बळीराजा हरकला; जाणून घ्या पावसाची राज्यभरातील स्थिती)

दरम्यान, ईशान्य भारतात विशेषतः आसाम मध्ये मुसळधार पाऊस बरसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोबतच उत्तर प्रदेशात सुद्धा हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. यंदा मान्सून मध्ये सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज सुरुवातीलाच वर्तवण्यात आला होता.