Monsoon 2020 Update In Mumbai: मुंबईत येत्या 48 तासात जोरदार पावसाची शक्यता, उद्या High Tide सुद्धा होणार, जाणून घ्या वेळ
पुढील 48 तास सुद्धा हीच परिस्थिती कायम राहील असे अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहेत. याशिवाय उद्या मुंबईत सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी समुद्रात भरती सहित उंच लाटा उसळणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.
Mumbai Monsoon 2020 Update: मुंबई (Mumbai) सह उपनगरात तसेच ठाणे (Thane), कल्याण डोंबिवली (Kalyan- Dombivli) , कोकण (Konkan), तळकोकण भागात आज पाऊस चांगलाच जोर धरून कोसळत होता. पुढील 48 तास सुद्धा हीच परिस्थिती कायम राहील असे अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहेत. याशिवाय उद्या मुंबईत सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी समुद्रात भरती सहित उंच लाटा (High Tide) उसळणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. या लाटा 4.57 मीटर उंच असतील. या कालावधीत कोणीही समुद्र किनाऱ्याजवळ जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. Coronavirus Update: महाराष्ट्रात आज कोरोनाचे 6,364 नवे रुग्ण,198 मृत्यू; राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1,92,990 वर
आज मुंबईत ठिकठिकांणी झालेल्या पावसाने पाणी साचले होते. यात मध्य उपनगरातील सायन, माटुंगा, शिवाजी पार्क ते दक्षिण मुंबईमध्ये सीएसएमटी (CSMT) परिसरात पावसाने जोर धरलेला होता. यामुळे दादरच्या हिंदमाता (Hindmata) परिसरात वॉटर लॉगिंग पाहायला मिळाले होते. मुंबईतील नळ बाजार मधील गोल देऊळ येथे अतिमुसळधार पावसामुळे वॉटर लॉगिंग झाले आहे.
पहा ट्विट
दरम्यान, हवामान वेधशाळेने यापूर्वीच 3 आणि 4 जुलै ला मुंबई, ठाणे, पालघर सह कोकणाला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये ढगांच्या गडगडाटासह, वीजा कडाडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.