Monsoon 2020: येत्या 8 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता; मान्सूनपूर्व पावसाला लवकरच सुरुवात- हवामान विभागाची माहिती

त्यामुळे राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी वातावरण ढगाळ राहू शकते.

उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा अशा स्थितीत सापडलेल्या महाराष्ट्राची लवकरच सुटका होणार आहे. येत्या 8 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) विरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपि (Dr Anupam Kashyapi) यांनी माहिती देताना सांगितले की, सध्याच्या हवामानाची स्थिती पाहता येत्या 8 जून पर्यंत मान्सून कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल. त्यानंतर पुढे 8 ते 14 जून या कालावधीत तो अवघा महाराष्ट्र व्यापेल. या दरम्यान, राज्यभरात विविध ठिकाणी पावसालाही सुरुवात होईल, असे कश्यपी म्हणाले.

डॉ. अनुपम कश्यपि यांनी सांगिले की, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा अरबी समुद्रात येमेनकढील बाजूस तयार झाला आहे. मात्र, त्याचा मान्सूनव कोणताही परिणाम संभवत नाही. हा पट्टा पुढे ओमानच्या दिशेने सरकेन. यादरम्यान, केरळ जवळ कमी दाबाचा पट्टा (सोमावर, दि. 1 जून 2020) तयार होऊ लागेन. त्याच्या प्रवासाची दिशा कशी आहे त्यावर बरेच अवलंबून असेन असेही कश्यपि यांनी सांगितले. (हेही वाचा, Mumbai Monsoon 2020 Date: मुंबईत जून च्या दुसऱ्या आठवड्यात 'या' दिवशी मान्सून दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज)

एएआय टवि

दरम्यान, येत्या 8 जूनला महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होत असले तरी, त्या आधीच महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो. त्यामुळे राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी वातावरण ढगाळ राहू शकते. तापमानातही बदल होण्याची शक्यता आहे. तर, काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट ऐकायला, पाहायला मिळू शकतो, अशी माहितीही डॉ. कश्यपि यांनी दिली.