Monsoon 2020 Updates: साऊथ वेस्ट मान्सून आज महाराष्ट्रात दाखल होणार, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
तसेच शनिवारी हवामान खात्याने मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला होता.
यंदाच्या वर्षात जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर हवामान खात्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात आज साऊथ वेस्ट मान्सून (South West Monsoon) दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच शनिवारी हवामान खात्याने मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून हा आठवडाभर त्याचा जोर कायम राहणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.(Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रातील विदर्भात आणि मध्य प्रदेशातील काही भागात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा-IMD)
हवामान खात्याने या वर्षातील पावसाचा अंदाज वर्तवल्याच्या आधीच पावसाचे आगमन झाल्याचे दिसले. त्यावेळी कुलाबा आणि सांताक्रुझ येथे पावसाच्या सरी कोसळल्याचे सुरुवातीला दिसून आले होते. 1 जूनला आयएमडी यांनी कुलाबा येथे 212.5mm पावसाची नोंद केली होती जी 76.3mm पेक्षा अधिक होती. तसेच सांताक्रुझ येथे 188.8mm पावसाची नोंद केली होती जी 62.2mmपेक्षा अधिक असल्याचे म्हटले होते.
मुंबईतील आयएमडी वैज्ञानिक शुभांगी भुटे यांनी असे म्हटले आहे की, शनिवारी साऊथ वेस्ट मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात दाखल झाला आहे. मात्र पुढील 24 तासात संपूर्ण राज्यासह मुंबईत सुद्धा तो दाखल होणार असल्याचे ही त्यांनी म्हटले. त्याचसोबत अतिवृष्टीचा ही अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.(Monsoon 2020 Updates: मुंबई, ठाण्यासाठी हवामान खात्याने दर्शवला Orange Alert, रविवारी अतिवृष्टी होण्याची शक्यता)
आयएमडी यांच्याकडून सोमवार आणि मंगळवारसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर येथील आयसोलेटेड परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे अतिमुसळधार ते तुफान पावसाची शक्यता दर्शवली जाते. तर जून 12-23 (8.30-8.30), हलक्या स्वरुपाचा पाऊस 91.3mm) आणि सांताक्रुझ(2.1mm) पडणार असल्याचे ही आयएमडी यांनी म्हटले आहे.