Monsoon 2020 Updates: मुंबई, ठाणे शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल; पश्चिम किनारपट्टीवर जोर वाढणार : हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाण्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाण्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्यरात्री 1 पासून वातावरण पोषक होण्यास सुरूवात झाली असून मागील 24 तासांत मुंबई शहर आणि नजिकच्या परिसरामध्ये 50mm पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान पुढील आठवड्याभरात पावसाची बरसात मुंबई, ठाणे या उपनगरामध्ये होऊ शकते. हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 11 जून दिवशी महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता राज्यभर पसरला आहे.
महाराष्ट्रात कोकणात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. मात्र मुंबईमध्ये अद्याप धुव्वाधार पाऊस झालेला नाही. मागील काही दिवसांत अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत.
ANI Tweet
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस हे पावसासाठी उत्तम आहेत. या दिवसामध्ये पश्चिम किनारपट्टीवर पाऊस बरसण्याची चिन्हं आहेत. सध्या मुंबईमध्ये पालिका प्रशासनाकडून मान्सूनच्या धर्तीवर विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आता पूराचा अलर्ट देणारी यंत्रणा देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच डेंग्यू, मलेरियाचा धोका पाहता ड्रोनच्या मदतीने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, सामना करण्यासाठी खास यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.