Monsoon 2019: मुंबई मध्ये लवकरच मान्सून दाखल होणार; BMC कडून 180 ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता व्यक्त

हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल.घाटकोपर स्टेशन या भागांसह 180 ठिकाणी पाणी साचू शकतं असं बीएमसीने मान्सून सक्रिय होण्याआधीच सांगितलं आहे.या ठिकाणी उपाय योजना म्हणून 232 पाणी उपसा पंप सज्ज ठेवले जाणार आहेत.

Waterlogging in Mumbai Dadar TT area | File Image | (Photo Credits: PTI)

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आता लवकरच मुंबईसह महाराष्ट्रात येत्या आठवड्याभरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. नुकत्याच ( 9 जून) च्या रात्री मुंबईमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसल्याने वातावरण थोडं अल्हाददायक झालं होतं. मात्र लव्करच मुंबईमध्ये पाऊस पडायला सुरूवात झाल्यानंतर मुंबानगरी 'तुंबई' होण्याची शक्यता आहे. यंदा मुंबईच्या 180 विविध भागांमध्ये पाणी साचू शकतं असा अंदाज व्यक्त बीएमसी कडून व्यक्त करण्यात आला आहेजून ते सप्टेंबर 2019 च्या काळात 28 दिवस मुंबई मध्ये उंच भरतीच्या लाटांची शक्यता

मुंबईच्या सखल भागामध्ये मध्यम पाऊस झाला तरीही पाणी साचणं ही नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल.घाटकोपर स्टेशन या भागांसह 180 ठिकाणी पाणी साचू शकतं असं बीएमसीने मान्सून सक्रिय होण्याआधीच सांगितलं आहे.या ठिकाणी उपाय योजना म्हणून 232 पाणी उपसा पंप सज्ज ठेवले जाणार आहेत.

मागील वर्षीच्या पावसात 225 ठिकाणी पाणी तुंबले होते. त्या भागात यंदाच्या पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्यात आली आहे. परिणामी 35 हून अधिक ठिकाणे पाणी तुंबण्यापासून मुक्त करण्यात बीएमसीला यश आल्याची माहिती देण्यात आली आहे.