Narendra Modi Temple: पुण्यात मोदी भक्ताने उभारले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदीर, सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
पुण्यातून असेच एक उदाहरण समोर आले आहे. पुण्यातील (Pune) औंध (Aundh) भागाममध्ये भाजप कार्यकर्त्याने चक्क नरेंद्र मोदीचे यांचे मंदिर (Modi Temple) उभारले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याच्यावर असलेले प्रेम उजागर करण्यासाठी मोदी भक्त काय करतील? हे सांगता येणार नाही. पुण्यातून असेच एक उदाहरण समोर आले आहे. पुण्यातील (Pune) औंध (Aundh) भागाममध्ये भाजप कार्यकर्त्याने चक्क नरेंद्र मोदीचे यांचे मंदिर (Modi Temple) उभारले आहे. या मंदिरातील नरेंद्र मोदींची मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच या मंदिरासमोर अनेकजण आवर्जून फोटो काढून घेत आहेत. या मंदिरानंतर संपूर्ण शहरात एकच चर्चा सुरु झाली आहे.
मयुर मुंडे असे मंदिर उभारलेल्या भाजप कार्यकत्याचे नाव आहे. त्यांनी पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. मोदींचा पुतळा तयार करण्यासाठी त्यांना 1 लाख 60 हजार रुपये इतका खर्च आला आहे. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा बॅनरही लावण्यात आला आहे. या मंदिरातील मोदींच्या मूर्तीची उंची 2 फूट इतकी आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागल्याचे मयुर मुंडे सांगतात. हे देखील वाचा- DSK Fraud Case : हेमंती कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायलयाकडून जामीन मंजूर; दीपक कुलकर्णींसाठी सर्वोच्च न्यायलयात अर्ज करणार
नरेंद्र मोदी यांच्या उपमा देण्यासाठी मोदी दररोज नववी कसरत करताना आपण पाहिले आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रवक्ते अवधूद वाघ यांनी मोदींची स्तुती करण्यासाठी एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार असल्याचे म्हटले आहे. तसेच देवासमान असून देशाची सेवा करतात. अवधूद वाघ यांच्या ट्विटवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.