Maharashtra Lockdown: मनसेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; राज्यातील व्यापाऱ्यांसाठी केली 'अशी' मागणी
याचबरोबर राज्यात कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात (Maharashtra) विकेंड लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. याचबरोबर राज्यात कडक निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. परंतु, राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. याचसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहण्यात आले आहे. ज्यात राज्यातील व्यापाऱ्यांना आठवड्यातील 3 दिवस दुकाने चालू ठेवण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून कडक कठोर नियम आणि निर्बंध लागू करण्यात आले आहे. परंतु, राज्य सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांसह छोट्या दुकानदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावा लागत आहे. गेल्यावर्षी ज्या वेळेस लॉकडाऊन सर्व देशात लावण्यात आला तेव्हा आपण पाहिलेच असेल की महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पण जेव्हा हाच लॉकडाऊन पुढे 4 ते 5 महिने चालू राहिला तेव्हा त्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांनंतर कोरोना अटोक्यात येत असताना त्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यानंतर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचा फटका व्यापारी वर्गांना बसत आहे. यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना किमान 3 दिवस दुकाने उघडण्याची परवानगी द्या, अशी विनंती यशवंत किल्लेदार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Pune: पुण्यात कोरोना विषाणूचा हाहाकार; शहराला संकटातून वाचवण्यासाठी घेतली जाणार Indian Army ची मदत
राज्यात आज 59907 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 30296 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2613627 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 501559 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36% झाले आहे.