MNS Leader Jamil Shaikh Murder Case: ठाणे पोलिसांकडून जमिल शेख हत्या प्रकरणी लायक शेख ला अटक; 3 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी

दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाण्यातील राबोडी परिसरात भरदिवसा जमिल शेख ला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याने सारा परिसर हादरला होता

Gun (Photo Credits: IANS)

ठाणे पोलिसांनी मनसे नेते जमिल शेख (Jamil Shaikh) यांच्या हत्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. लायक शेख (Layak Sheikh)असं त्या व्यक्तीचं नाव आहे. दरम्यान काल (26 नोव्हेंबर) दिवशी लायक शेखला कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने लायक शेख ला 3 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.सध्या या हत्येचा अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाण्यातील राबोडी परिसरात भरदिवसा जमिल शेख ला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याने सारा परिसर हादरला होता. क्लस्टर प्रोजेक्टला विरोध केल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे, असा आरोप ठाणे जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.

ANI Tweet

जमील शेख हे घरी येत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला. बाइकवरून आलेल्या दोन जणांपैकी बाइकवर मागे बसलेल्या एकाने जमील यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, डोक्याला गोळी लागण्याने जमील खाली कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर काही दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यावेळी परिसरात त्यांचे चाहते आणि हिंतचिंतकांची मोठी गर्दी पहायला मिळाली होती.