Devendra Fadnavis, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अभिनंदन करताना तोंडभरुन कौतुक केले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray on Devendra Fadnavis) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पत्र शेअर केले आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी ''महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…” असं म्हणत पत्राची सुरुवात केली आहे. तर, “ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे,” असं म्हणत पत्राचा शेवट केला आहे.

राज ठाकरे यांचे पत्र (जसेच्या तसे)

श्री. देवेंद्र फडणवीस

उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

यांसी सस्नेह जय महाराष्ट!

प्रिय देवेंद्रजी,

सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…”

“तुम्ही यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं अशूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उपम-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात टेवण्यासाठी आहे. खरोखरच अभिनंदन!” (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट? राजकीय वर्तुळात चर्चेला उधान)

‘आता जरा आपल्यासाठी’

“ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिद्ध केलेलंच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!”

-राज ठाकरे

Raj Thackeray letter

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अभिनंदन केले. त्यांना शुभेच्छा दिल्या. पण त्यासोबतच त्यांनी या नव्या सरकारवर टीकाही केली. अशात राज ठाकरे यांनी केलेले कौतुक पाहता मनसे, भाजप जवळीक वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

.