राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhansabha Election) राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. तर प्रत्येक पक्षाकडून विधानसभेसाठी रणनिती ठरवली जात आहे. याच पार्श्वभुमीवर मनसे (MNS) पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज दिल्लीसाठी (Delhi) रवाना झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज ठाकरे यांच्यासोबक पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर आणि अनिल शिदोरे सुद्धा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. तर उद्या (8 जुलै) राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत आलेले नेते केंद्रीय आयुक्तांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी ईव्हीएम बद्दल भुमिका मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील समीकरण बदलणार?)
काही दिवसांपूर्वी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही दुसऱ्यांदा राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली होती. या दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. राजू शेट्टी यांनी याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरे यांची भेट घेतली होती.