MLC Elections 2022: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, विधानसभा निवडणुकीत मतानासाठी परवानगी मिळावी
येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC Elections 2022) मतदानाचा हक्क वापरण्यासाठी एक दिवसाची मुदत मिळावी अशी विनंती अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे.
मनी लॉन्डींग (Money Laundering) प्रकरणात सध्या कोठडीत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC Elections 2022) मतदानाचा हक्क वापरण्यासाठी एक दिवसाची मुदत मिळावी अशी विनंती अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे. अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी मुंबई न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या एकल खंडपीठाडकडे केलेल्या अर्जात तसा उल्लेख करण्यात आला आहे.
वकील इंदिर पाल सिंह यांनी म्हटले आहे की, आमची बाजू ऐकण्यासठी कोर्टाने 15 जून रोजी सुनावणी ठेवली आहे. देशमुख यांनी न्यायालयाकडे एमएलसी निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी त्यांना 20 जून रोजी जातमुचलक्यावर सोडण्याची मागणी केली असल्याचेही वकीलाने सांगितले. (हेही वाचा, MLC Elections 2022: माघार नाही, विधानपरिषद निवडणूक होणारच; 10 जागांसाठी 11उमेदवार रिंगणात)
दरम्यान, तत्पूर्वी, देशमुख यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी 10 जून रोजी सोडण्याची परवानगी विशेष न्यायालयाकडे मागितली होती. मात्र, त्यांची याचिका फेटाळण्यात आली. देशमुख 2 नोव्हेंबर 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत.
राज्य विधानमंडळाच्या वरच्या सभागृहातील 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. राज्य विधानसभेचे सदस्य एमएलसी निवडणुकीसाठी निवडणूक महाविद्यालय तयार करतात. राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत, तर विरोधी भाजपने एमएलसी निवडणुकीसाठी पाच उमेदवार उभे केले आहेत.