MLC Elections 2022: माघार नाही, विधानपरिषद निवडणूक होणारच; 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात

Vidhan Parishad Elections 2022: राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणूकही बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात (MLC Elections 2022 असणार आहेत. एकूण 10 जागांसाठी भाजपचे पाच तर महाविकासआघाडीचे सहा उमेदवार रिंगणात असणार आहेत.

MLC Elections 2022: माघार नाही, विधानपरिषद निवडणूक होणारच; 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात
Maharashtra Legislature | (File Photo)

Vidhan Parishad Elections 2022: राज्यसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणूकही बिनविरोध करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात (MLC Elections 2022 असणार आहेत. एकूण 10 जागांसाठी भाजपचे पाच तर महाविकासआघाडीचे सहा उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे राज्यसभेप्रमाणेच विधानसभेचीही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत यांनी आणि राष्ट्रवादीच्या वतीने शिवाजीराव गर्जे यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदावारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी झाली असली तरी, निवडणुकीच्या रिंगणात एक उमेदवार अधिक आहे. त्यामुळे पराभूत होणारा 11 वा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता आहे.

विधान परिषदेसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार

शिवसेना- (Vidhan Parishad Shiv Sena Candidate)

सचिन अहिर (Sachin Ahir), आमश्या पाडवी (Aamshya Padvi)

राष्ट्रवादी- (NCP Vidhan Parishad Candidate)

एकनाथ खडसे (Eknath Khadse), रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)

काँग्रेस- (Vidhan Parishad Congress Candidate)

भाई जगताप (Bhai Jagtap), चंद्रकांत हंडोरे (Chandrant Handore)

भाजप (Vidhan Parishad BJP Candidate)

प्रवीण दरेकर (Pravin Darekar), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad)  (हेही वाचा, MLC Election 2022: पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषद नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्याकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रतिक्रिया)

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. हे दोन आमदार म्हणजे एक राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि दुसरे म्हणजे मंत्री नवाब मलिक. या दोघांनाही मतदानाची परवानगी मिळाली नाही. आता विधानसभा निवडणुकीत तरी किमान या दोघांना मतदानासाठी परवानगी मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2022 04:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).