MLAs Disqualification Case in Maharashtra: आमदार अपात्रतेच्या निकालात 'मॅचफिक्सिंग' आधीच झालंय - संजय राऊत

उद्धव ठाकरेंकडून या भेटीवरही आक्षेप घेण्यात आला आहे. त्या विरूद्धही ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे.

Sanjay Raut | Twitter

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आज (10 जानेवारी) आमदार अपात्रतेप्रकरणी (MLAs Disqualification Case) आपला निकाल देणार आहेत. आज 4 च्या सुमारास हा निकाल देण्यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये मॅचफिक्सिंग झाल्याचा' आरोप केला आहे. ज्याअर्थी 12 जानेवारीला पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार आहेत त्याअर्थी त्यांना राज्यात सरकार आणि मुख्यमंत्री टिकणार आहेत असा विश्वास असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे या निकालाची कल्पना पंतप्रधानांना देखील असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौर्‍याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचाही डावोस दौरा ठरलेला आहे याचा उल्लेखही राऊतांनी केला आहे. दरम्यान काल निकालाच्या एक दिवस आधी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली. उद्धव ठाकरेंकडून या भेटीवरही आक्षेप घेण्यात आला आहे. त्या विरूद्धही ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे.

पहा संजय राऊत यांची प्रतिक्रिया

राहुल नार्वेकर यांनी आजचा निकाल 'बेंचमार्क' निकाल असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल कायद्याच्या चौकतीत राहूनच दिला जाईल असेही नार्वेकर म्हणाले आहेत. दरम्यान आमदार अपात्रतेमधून शिंदे गटाने आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके यांना वगळले आहे. (हेही वाचा, Rahul Narwekar On MLAs Disqualification Case: असंवैधानिक निर्णय झाला तरच सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करेल; राहुल नार्वेकर यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य).

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री 'वर्षा' वर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलिस अधिकार्‍यांसोबत तातडीची बैठक घेतली आहे. यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आढावा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या महाराष्ट्राची सत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे. त्यांना शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा आहे.