पुणे: काँग्रेस-राष्ट्रवादीने 60 दिवसांत थकवल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 3 दिवसीय सुट्टीवर - नितेश राणे
काँग्रेस-राष्ट्रवादीने 60 दिवसांत मुख्यमंत्र्यांना थकवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री 3 दिवसीय सुट्टीवर गेले आहेत, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. नितेश राणे पुण्यातील कामशेत येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) तीन दिवसांच्या सुट्टीवर गेल्यामुळे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने 60 दिवसांत मुख्यमंत्र्यांना थकवले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री 3 दिवसीय सुट्टीवर गेले आहेत, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. नितेश राणे पुण्यातील कामशेत येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना कधी सुट्टी घेतली का? नागपूरला सुट्टीवर गेले, असं तुम्ही कधी ऐकलं का? तसचं पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 6 वर्षांपासून देशाची सेवा करत आहेत. मात्र ते गुजरातला आईकडे सुट्टीवर गेले, असं कधी ऐकलं का? परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 60 दिवसातच थकले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना हैराण केले आहे. त्यामुळे ते थेट महाबळेश्वरला गेले आहेत, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले. (हेही वाचा - फडणवीस सरकारच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात जाहिरांतीवर 15 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च)
महाविकास आघाडी मंत्रीमंडळात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतात. शिवसेनेचे मंत्री फक्त टेबलवरील पेन आणि फाईल उचलण्याचे काम करतात. शिवसेनेचे मंत्री मंत्रीमंडळात कारकूनासारखे बसलेले असतात, अशा खोचक शब्दांत नितीश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.