Close
Search
यरल व्हिडिओ">Women Group Danced in Delhi Metro: एवढचं पाहायचं राहिलं होतं! दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचा ग्रुप डान्स, पहा व्हायरल व्हिडिओ
  • Woman Enters Delhi Bus Wearing A Bikini: काय सांगता? फक्त बिकिनी घालून महिलेने केला दिल्लीच्या बसमधून प्रवास; व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
  • Close
    Search

    फडणवीस सरकारच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात जाहिरांतीवर 15 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च

    महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात वृत्तपत्र जाहिरात वगळता केवळ टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवरील जाहिरातींसाठी गेल्या 5 वर्षांत तब्बल 15 कोटी 51 लाख रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील नितीन यादव यांनी माहिती अधिकारातून ही माहिती मागवली होती.

    महाराष्ट्र Bhakti Aghav|
    फडणवीस सरकारच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात जाहिरांतीवर 15 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च
    Devendra Fadnavis | Image only representative purpose (Photo credit: File Image)

    महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात (Fadnavis Government Tenure) वृत्तपत्र जाहिरात वगळता केवळ टीव्ही आणि रेडिओ वाहिन्यांवरील जाहिरातींसाठी गेल्या 5 वर्षांत तब्बल 15 कोटी 51 लाख रूपये खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील नितीन यादव (Nitin Yadav) यांनी माहिती अधिकारातून (Right to Information) ही माहिती मागवली होती.

    फडणवीस सरकारने 2017-18 साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल 5 कोटी 99 लाख 97 हजार 520 रुपये खर्च केले होते. तसेच याच वर्षात रेडिओ जाहिरातींवर तब्बल 1 कोटी 20 लाख 69 हजार 877 रुपये खर्च केले होते. 2013-2014 मध्ये फडणवीस सरकारने रेडिओ वाहिन्यांवरील जाहिरांतीवर 59 लाख 96 हजार 291 रुपये इतका खर्च केला होता. तसेच यात 2018-2019 मध्ये वाढ होऊन तो 1 कोटी 85 लाख 72 हजार 887 झाल्याचे दिसत आहे. (हेही वाचा - Budget 2020: अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात 10 वर्षातील सर्वात मोठी घसरण; एका दिवसात 3.46 लाख कोटी बुडाले)

    तसेच 2013-2014 साली टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी फडणवीस सरकारने 53 लाख 25 हजार 730 रुपये खर्च केला होता. तो 2018-2019 साली वाढून तब्बल 2 कोटी 84 लाख 48 हजार 317 रुपये झाला असल्याची माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. फडणवीस सरकारच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 15 कोटी 51 लाख रुपये जाहिरातींवर खर्च करण्यात आले आहेत. या माहितीवरून फडणवीस सरकारने दिवसाला सरासरी 85 हजार रुपये खर्च केला असल्याचे यादव यांनी सांगितले आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना 'वायफळ खर्च न करतो तो पैसा मुख्यमंत्री सहायता निधीला द्या, असे आवाहन केले होते. मात्र माहिती अधिकारातून फडणवीस सरकारचा जाहिरांतीवरील खर्च उघडकीस आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change
    शहर पेट्रोल डीझल
    कोल्हापूर 106.06 92.61
    मुंबई 106.31 94.27
    नागपूर 106.63 93.16
    पुणे 106.42 92.92
    View all
    Currency Price Change