मीरा भाईंदर: शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू
मीरा भाईंदरचे (Mira-Bhayandar) शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर (Harishchandra Amgaonkar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी ही दु:खद बातमी शेअर केली आहे.
मीरा भाईंदरचे (Mira-Bhayandar) शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आंमगावकर (Harishchandra Amgaonkar) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी ही दु:खद बातमी शेअर केली आहे. दरम्यान सोशल मीडीयामध्ये हे वृत्त शेअर करताना त्यांनी हरिशचंद्र आमगावकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान आठवड्यापूर्वी त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. ठाण्यामध्ये वेदांत हॉस्पिटलमध्ये (Vedant Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यासोबतच त्यांच्या घरातील काही व्यक्तींनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसचा कहर! दिवसभरात 64 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू; तर 1314 जणांना कोरोनाची लागण.
हरिश्चंद्र आंमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये दोन टर्म नगरसेवक होते. यापूर्वी त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून काम करत होते. तर हरिश्चंद्र हे आमदार प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते.
आमदार प्रताप सरनाईक यांची श्रद्धांजली
दरम्यान हरिश्चंद्र आंमगावकर यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर भाऊ आणि आई यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 88 हजार 528 वर पोहचली आहे. यापैकी 3 हजार 169 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 40 हजार 975 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)