Mumbai Shocker: मानसिक आजार असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कॅब चालकाला अटक

मानसिक आजार असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Representative Image

Mumbai Shocker: मानसिक आजार असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी कॅब चालकाला अटक केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, कॅब चालकाने तीला आमिष दाखवून सोबत नेले आणि त्यानंतर तीच्यावर बलात्कार केला. मोहम्मद जलील खलील असं आरोपीचे नाव आहे. तो वडाळा येथे राहतो. (हेही वाचा- लोणावळ्यात व्हिला भाड्याने घेऊन ॲडल्ट फिल्मचे शूटींग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मिळालेल्या माहितीनुसार, नामांकित कॅब कंपनी उबेर या कंपनीत चालक म्हणून काम करणारा मोहम्मद जलील खलील याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. पीडित मुलगी मानसिक आजारी आहे. ती नातेवाईकांकडे आली होती. रात्री एकच्या सुमारास ती घरातून बाहेर पडून रस्त्यावर उभी होती. यावेळी आरोपी मोहम्मद तीच्या जवळ आला.

तीला मुंबई दाखवण्याच्या बहाणे कॅबमध्ये बसवले. त्यानंतर तो तीला दादर पश्चिम येथील उड्डाणपुलाजवळील गल्लीत नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा तीला तीच्या नातेवाईकांच्या घरा जवळ सोडलं. दरम्यान त्याने तीला स्वत: चा फोन नंबर दिली. पुन्हा भेटण्यासाठी कॉल करण्यास सांगितले. पीडितेने या घटनेची माहिती घरच्यांना दिली. घरच्यांनी तिला दादर पोलिस ठाण्यात नेलं. दादर पोलिसांनी आरोपीविरोधात तक्रार नोंदवला.

एका अधिकाऱ्यांने सीसीटीव्ही तपासले आहे. कॅबचा नंबर नोट करून घेतल्याने आरोपीचा शोध सुरु केला. एकाने पीडित मुलीकडे असलेला नंबर स्ट्रेस केला.फोन नंबरच्या आधारे आरोपीचा शोध लागला. पोलिसांनी आरोपीला वडाळा येथून अटक केले.