Adult Film Shooting In Lonavala: लोणावळ्यात व्हिला भाड्याने घेऊन ॲडल्ट फिल्मचे शूटींग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी अश्लील डिजिटल सामग्री पुरवणाऱ्यांसाठी तसेच काही अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट फिल्म्सची निर्मिती करत होती. विविध राज्यातील तरुण-तरुणी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Adult Film Shooting In Lonavala: लोणावळ्यात व्हिला भाड्याने घेऊन ॲडल्ट फिल्मचे शूटींग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Arrest | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Adult Film Shooting In Lonavala: पुण्यात कधी ड्रग्ज तर कधी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश होत असतानाच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लोणावळ्यात व्हिला भाड्याने घेऊन तिथे ‘ॲडल्ट फिल्म’ (Adult Film) बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती आल्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला. इतर राज्यातील 15 तरुणांचा समूह हे ॲडल्ट चित्रपट बनवत असल्याची माहिती समोर आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी अश्लील डिजिटल सामग्री पुरवणाऱ्यांसाठी तसेच काही अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मवर ॲडल्ट फिल्म्सची निर्मिती करत होती. विविध राज्यातील तरुण-तरुणी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लोणावळ्यात पोलिसांनी या व्हिलावर छापा टाकला. त्यानंतर येथे ॲडल्ट व्हिडिओचे शूटिंग सुरू असल्याचे समोर आले. पोलिसांनी शूट केलेले सर्व फुटेज ताब्यात घेतले आहेत. यासोबतच कॅमेरे व इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2024 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).