Minor Girl Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वेश्याव्यवसायासाठी दबाव; जोडप्यास 10 वर्षांचा सश्रम कारावास

Mumbai News: अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Woman Raped) केल्यानंतर तिला वेश्याव्यवसाय (Prostitution) करण्यासाठी जबरदस्ती करणे आणि तिला तो करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल एका जोडप्यास 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे.

Court_AC | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai News: अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Woman Raped) केल्यानंतर तिला वेश्याव्यवसाय (Prostitution) करण्यासाठी जबरदस्ती करणे आणि तिला तो करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल एका जोडप्यास 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. अल्पवयीन असताना झालेल्या अत्याचारामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे पाच वर्षांपेक्षाही अधिक काळ मनोरुग्णालयात दाखल असलेल्या 21 वर्षीय तरुणीस विशेष पोक्सो कोर्टासमोर (POCSO Court) हजर करण्यात आले. कोर्टाने तरुणीचा जबाब आणि सर्व पुरावे पुन्हा एकदा तपासून पाहिले आणि दोषींना कठोर शिक्षा दिली. धक्कादाय म्हणजे हे जोडपे पती-पत्नी आहेत. पतीने पीडितेवर अत्याचार केले त्यानंतर पत्नीने पीडितेस वेश्याव्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केली.

बलात्कार करुन वेश्याव्यवसायासाठी जबरदस्ती

मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनीही अहवाल आणि पुरावा म्हणून माहिती देताना तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पुष्टी केली. पीडिता ही 16 वर्षंची असताना तिच्या मावशीसोबत राहात होती. मावशीसोबत झालेल्या वादानंतर ती घरातून पळून गेली होती. दरम्यान, ती आरोपींच्या (जोडपे) संपर्कात आली ज्यांनी तिच्यावर बलात्कार केला. 26 ते 33 वर्षे वयोगटातील आरोपींना शिक्षा ठोठवताना पॉक्सो कोर्टाने म्हटले की, या घटनेमुळे ती महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली होती आणि अनेक वर्षानंतरही ती मानसिक रुग्णालयात होती. आरोपी दयेस पात्र नाहीत. धक्कादायक म्हणजे आरोपींनाही स्वत:ची पाच वर्षांची मुले आहेत. असे असतानाही आरोपींनी हे कृत्य केले. या कृत्यास कठोर शिक्षाच व्हायला हवी. (हेही वाचा, Haryana Shocker: 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार,तिघांवर गुन्हा दाखल)

महिला आणि पुरुष दोषी

दरम्यान, कोर्टाने दोषी पुरुषाला लैंगिक अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत तर, महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास जबरदस्ती आणि प्रवृत्त केल्याबद्दल दोषी धरले. या दोघांना अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत वेश्याव्यवसायाच्या कमाईवर जगणे आणि वेश्याव्यवसाय चालत असलेल्या परिसरात एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले. यासोबतच ते भारतीय दंड संहितेअंतर्गत अपहरण आणि गुन्हेगारी धमकावल्याबद्दलही दोषी आढळले. (हेही वाचा- भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीची हत्या)

विशेष सरकारी वकील वीणा शेलार यांनी पीडितेची बाजू माडंली. पीडितेच्या वकीलांनी आरोपींविरोधात एका महिलेसह 11 साक्षीदारांच्या पुराव्यांचा हवाला दिला. पीडितेने सांगितले की, घरातून बाहेर पडल्यानंतर ती एका पुरुष मित्रासोबत फिरत होती. या मित्राने तिला याजोडप्याकडे नेले. तिने सांगितले की, तिला ऑक्टोबर 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत ग्राहकांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. दरमयान, ती पळून जाण्यात यशस्वी झाली. पोलिसांना ती रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी तिला सांगितले की, आरोपींनी तिला अश्लील चित्रे दाखवली होती. तिथे तिला अनेकांसोबत संबंध ठेवण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर तिचे अश्लिल फोटोही काढण्यात आले. वकिलांनी कोर्टात महिलेची 52 अश्लिल छायाचित्रे पुरावा म्हणून सादर केली. फोटोंमध्ये दोन आरोपीही दिसत होते. मात्र, महिलेची उलटतपासणी होऊ शकली नाही. सुरुवातीला बचाव पक्षाच्या वकिलाने वेळ मागितला असता, नंतर पीडितेला साक्ष देण्यास अपात्र मानले गेले. मानसिक रुग्णालयाच्या अहवालानुसार, ‘कोर्ट’ हा शब्द ऐकून ती महिला हिंसक झाली आणि त्यामुळे तिला उलटतपासणीसाठी न्यायालयात हजर करता आले नाही.