Uttar Pradesh Crime: भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीची हत्या, सहारनपूर येथील थरारक घटना

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पत्नीचे भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरू गर्भवती पत्नीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

Uttar Pradesh Crime: भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीची हत्या, सहारनपूर येथील थरारक घटना
UP Murder Case PC Twitter

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पत्नीचे भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरू गर्भवती पत्नीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी पतीने एचडीएफसी बॅंकेच्या एटीएममध्ये घूसून पत्नीवर गोळी झाडून हत्या केली आहे. पत्नीच्या हत्येनंतर आरोपींने भावाच्या घरी गेला आणि तेथे भावावर देखील गोळी झाडली या घटनेत तो गंभीर जखमी झाला. ( हेही वाचा- नेपाळी व्यक्तीने पत्नीची गळा दाबून केली हत्या, गुरुग्राम येथील खळबळजनक घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आरोपीचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी या घटनेअंतर्गत आरोपीला अटक केले आहे. पत्नीने भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेतला आणि तीच्या पोटात भावाचे मुल असल्याचा संशय आरोपीला आला त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सकाळी ८. ३० ते ९.०० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. मंडी ठाणे परिसरात असलेल्या एचडीएफसी बॅंकेच्या एटीएममध्ये पतीने घुसून पत्नीवर गोळी झाडली. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसत आहे. आलिया असं मृत महिलेचे नाव आहे. झीशान असं आरोपी पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने अनैतिक संबंध असलेल्या भावाच्या घरी गेला आणि तेथे त्याने गोळीबार केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

जखमी भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. भावाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून एटीएममध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2024 03:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).