अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, शैक्षणिक कर्ज योजनेसाठी कौंटुबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

अल्पसंख्यांक समाजीत विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. कारण अल्पसंख्यांक विकासमंत्री यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आता कौंटुबिक वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे आता वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत केल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. यापूर्वी वार्षिक उत्पन्नाची अट 2 लाख रुपये होती. पण आता या निर्णयानंतर अधिकाधिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडून विविध समाजातील विद्यार्थ्यांना मदत केली जाते. यामध्ये 18 ते 32 वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना व्यावसायिक किंवा उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. यावर 33 टक्के व्याज आकारले जाते. शिक्षण पूर्ण झाल्याच्या पुढील सहा महिन्यानंतर 5 वर्षाच्या आत कर्जाची रक्कम भरावी लागते. या योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी www.mamfdc.maharashtra.gov.in किंवा https://malms.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

तसेच डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक कर्जामधून 5 लाखांपर्यंत कर्ज विद्यार्थ्यांना दिले जाते. यामध्ये शहरातील विद्यार्थ्याला वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपये आणि ग्रामीण भागात 98 हजार रुपये उत्पन्न दाखवावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना यासाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी येत्या 16 जून पासून आंदोलनास सुरुवात होत आहे. या आंदोलनाबाबत माहिती देताना संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, हे आंदोलन कोल्हापूर येथून सुरु होईल. आता यापुढे समाज बोलणार नाही तर लोकप्रतिनिधी अलेले आमदार आणि खासदार तसेच मंत्री बोलतील. जर समाजाच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मंत्रालयापर्यंत लॉन्ग मार्च काढण्याचा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी या वेळी दिला.