नागपूर मध्ये हिजाब सावरताना दातात पकडलेला सेफ्टी पिन चिमुकलीने दातात पकडला अन चुकून गिळला; पहा डॉक्टरांनी कसं दिलं तिला जीवनदान

डॉक्टरांनी चिमुकली वर non-invasive bronchoscopy केली आणि तो पिन सुरक्षितपणे बाहेर काढला.

हॉस्पिटल । Representational Image (Photo Credit: PTI)

हिजाब नीट करताना दातांमध्ये पकडलेली सेफ्टी पीन एका अल्पवयीन मुलीच्या  तोंडात गेली. मीडीया रिपोर्टनुसार ही चिमुकली आपल्या मोठ्या बहिणीचं अनुकरण करत होती. पण त्या गोंधळामध्ये पिन घशामध्ये गेला. हा प्रकार समजल्यानंतर तातडीने तिच्या कुटुंबियांनी मुलीला हॉस्पिटल मध्ये दाखल केले. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार, हा प्रकार शाळेमध्ये झाला आहे. लंच ब्रेक असताना हिजाब सावरण्यासाठी तिने पिन काढला. हा पिन हिजाब सावरण्यासाठी तिने दातांमध्ये धरला. हा प्रकार तिने अनेकदा घरी बघितला होता, त्यामुळे तिनेही त्याचच अनुकरण केलं पण तो तिच्या घशात गेला. पिन गिळल्यानंतर तिला अवस्थ वाटू लागले. मुलीच्या कुटुंबाने तातडीने तिला हॉस्पिटल मध्ये नेले.

नागपूरच्या Mayo Hospital मधील ENT department of IGGMCH मध्ये तिला नेण्यात आलं. एक्सरे काढल्यानंतर तिच्या श्वासनलिकेमध्ये तो अडकल्याचं दिसला. डॉक्टरांनी चिमुकली वर non-invasive bronchoscopy केली आणि तो पिन सुरक्षितपणे बाहेर काढला. सर्जरी नंतर 24 तास या मुलीला निगराणी खाली ठेवण्यात आले. रविवारी तिला हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली.

अनेकदा मुली ओढणी, साडी, हिजाब नीट करताना पिन तोंडात पकडतात पण त्यांची ही सवय कधी अपघाताने जीवघेणे देखील ठरू शकते त्यामुळे या सवयी टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी महिला वर्गाला दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif