राज ठाकरे यांना आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा त्रास झाला नाही का? एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल
परंतु, त्यांना आत्ताच का मशिदीवरील भोंग्याचा त्रास व्हायला लागला? असा खोचक सवाल एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसेच्या अधिवेशनामध्ये पक्षाची पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. यावेळी राज ठाकरे यांनी पक्ष हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले.
मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत. परंतु, त्यांना आत्ताच का मशिदीवरील भोंग्याचा त्रास व्हायला लागला? असा खोचक सवाल एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiyaz Jaleel) यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी गुरुवारी मनसेच्या अधिवेशनामध्ये पक्षाची पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. यावेळी राज ठाकरे यांनी पक्ष हिंदुत्वाकडे जात असल्याचे स्पष्ट संकेतही दिले.
हिंदू धर्मात आरती केल्यास त्याचा कुणालाही त्रास होत नाही. मग तुमच्या मशिदीवरील भोंग्याचा त्रास आम्ही का सहन करायचा? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित करत आतापर्यंत राज ठाकरे यांना मशिदीच्या भोंग्याचा त्रास होत नव्हता का? असा सवाल केला आहे. इम्तियाज जलील आज औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (हेही वाचा - Maharashtra Bandh: 'वंचित'कडून आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक; पहाटेच बस अडवण्याचा घाटकोपर मध्ये करण्यात आला प्रयत्न)
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यानाच शिंगावर घेतले आहे. त्यामुळे आम्ही मनसेलाचं काय कोणालाही घाबरत नाही, असा विश्वासही इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही राज ठाकरे यांना नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून फटकारले आहे. राज ठाकरे यांनी गुरूवारी मनसे अधिवेशनादरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना तिखट शब्दांत सुनावले आहे. राज ठाकरे यांच्याकडे भारतामध्ये किती पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोक आले आहेत याचा नेमका आकडा आहे का? त्यांनी उगाच मुसलमानांच्या नावाने ढोल बडवू नये, असा खोचक सल्लाही दिला आहे.