Palghar Earthquake : आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं पालघर, डहाणू; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

भारतीय वेधशाळेने (Indian Meteorological Department )दिलेल्या माहितीनुसार 3.1 रिस्टर स्केलचा हा भूकंप होता.

Mild tremor hits Palghar district | Representational Image | (Photo Credits: PTI)

Palghar  Earthquake : पालघर (Palghar) परिसर 2 डिसेंबर रविवारच्या मध्यरात्री पुन्हा हादरले. भारतीय वेधशाळेने (Indian Meteorological Department  )दिलेल्या माहितीनुसार 3.1  रिस्टर स्केलचा हा भूकंप होता. या भूकंपाचे केंद्रस्थान डहाणू होत. हे भूकंपाचे धक्के 13 किलोमीटर खोल होते.  रविवारच्या मध्यरात्री 3  धक्के बसल्याने डहाणू,पालघर परिसरामध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे. हा . आठवड्यातील दुसरा भूकंपाचा धक्का आहे.

Mild tremor hits Palghar district (Photo Credits www.imd.gov.in)

24  नोव्हेंबरला पालघर भागामध्ये 3. 3 रिस्टर स्केलचा हा भूकंप जाणवला होता. या भूकंपामध्ये जीवहानी झालेली नाही. मात्र पालघर भागात घरांना सरकारी कार्यालयांमध्ये भूकंपामुळे तडे गेले आहेत. रविवारी सकाळी नाशिक, वलसाड, ठाणे, सिल्व्हासा या भागांमध्येही भूकंप जाणवल्याचे Indian Meteorological Department च्या वेबसाईटवर दाखवण्यात आले आहे. पालघरमध्ये जव्हार,डहाणू, विक्रमगड हे भाग भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये येतात.