MHT CET 2019 BE Provisional Merit जाहीर; अधिकृत वेबसाईट fe2019.mahacet.org वर पहा स्टेटस आणि संपूर्ण वेळापत्रक

काल ( 2 जुलै) रात्री उशिरा पहिली प्रोव्हिजनल लिस्ट जाहीर करण्यात आली आहे.

Result | Representational Image (Photo Credits: gettyimages)

12 वी परीक्षेनंतर इंजिनियरिंग, फार्मसी यासारख्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी MHT CET 2019 ही प्रवेश परीक्षा महत्त्वाची आहे. या परीक्षेच्या निकालानुसार आता प्रवेश प्रकियेला सुरूवात झाली आहे. BE च्या प्रवेश प्रक्रियेसाठी पहिली प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. 2 जुलैला संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणारी ही मेरीट लिस्ट रात्री उशिरा अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. 4 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या नावामधील चूका, कागदपत्र, व्हेरिफिकेशनची कागदापत्र सादर करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यानंतर 5 जुलै दिवशी पहिली अंतिम यादी जाहीर होणार आहे. यंदा 3 कॅप राऊंड्समध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.

Provisional Allotment of CAP Round चं वेळापत्रक

अंतिम यादी - 5 जुलै 2019

पहिली यादी (CAP Round  I) - 10 जुलै

दुसरी यादी (CAP Round  II) - 20 जुलै

तिसरी यादी  ((CAP Round  III) - 28 जुलै

यंदा पहिल्यांदाच MHT CET 2019 ही परीक्षा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली होती. 2 ते 13 मे दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेलासुमारे 4.13 हजार विद्यार्थी सामोरे गेले होते. या परीक्षेचा निकाल 4 जून 2019 दिवशी जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांसाठी पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.