MHADA Pune Lottery: पुणेकरांसाठी खुशखबर! म्हाडा कडून दिवाळी निमित्त 3 हजारांहून अधिक घरांसाठी सोडत, जाणून घ्या अधिक

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कमी आणि मध्यम उत्पन्न वर्गातील खरेदीदारांना परवडणारी आणि दर्जेदार घरे देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) दिवाळीच्या दिवशी लॉटरी काढण्याची शक्यता आहे.

म्हाडा (Photo Credits-Facebook)

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कमी आणि मध्यम उत्पन्न वर्गातील खरेदीदारांना परवडणारी आणि दर्जेदार घरे देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) दिवाळीच्या दिवशी लॉटरी काढण्याची शक्यता आहे. एबीपी माझ्याच्या रिपोर्ट्सनुसार, या परिसरात 3,000 हून अधिक घरे (फ्लॅट) उपलब्ध आहेत. पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी दीड हजार घरे ही नामांकित आणि मोठ्या बिल्डर्सची असणार आहेत. जाणून घ्या घरासाठी कोणत्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार.(MHADA Konkan Board Lottery 2021 Winners List: म्हाडा कोकण विभागीय मंडळातील सोडतीतील यशस्वी आणि प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची इथे पहा यादी)

-डोमेसाइल सर्टिफिकेट

-शाळा सोडल्याचा दाखला

-पासपोर्ट

-जन्मदाखला

-वाहन परवाना

-मतदान कार्ड

-आधार कार्ड

-पॅन कार्ड

कोण ठरणार पात्र?

-घरासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षाहून अधिक असावे

-अर्जदाराकडे डोमेसाइल सर्टिफिकेट असावे

-पॅन कार्ड असणे अत्यावश्यक

-अर्जदाराचे महिन्याभराचे उत्पन्न 25001-50000 रुपयांपर्यंत असावे. अर्जदार LIG (Lowe Income Group) साठी अर्ज करु शकतात

-अर्जदाराचे महिन्याभराचे उत्पन्न 50001-75000. असे अर्जदार MIG (Middle Incoem Group) करु शकतात

-अर्जदाराचा महिन्याभराचे पगार 75000 किंवा त्याहून अधिक असेल तर ते HIG (Higher Income Group) साठी करु शकतात.



संबंधित बातम्या