MHADA Pune Board Lottery 2020: पुण्यात म्हाडाच्या 5647 घरांसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला lottery.mhada.gov.in वर सुरूवात; इथे पहा महत्त्वाच्या तारखा

यामध्ये पुणे सोबतच सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घरं उपलब्ध आहेत.

MHADA | Photo Credits: File Photo

MHADA Pune Board House Online Registration:  म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळाकडून आजपासून 5647 घरांसाठी नोंदणीला सुरूवात होत आहे. यामध्ये पुणे सोबतच सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरूवात होणार आहे. तर या घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने सोडत जानेवारी महिन्यात जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पुण्यात तुमचं घर घेण्याचं स्वप्न या म्हाडाच्या घराद्वारा पूर्ण करण्याचा मानस असेल तर पहा नेमकी या सोडतीमध्ये कुठल्या भागात कोणती घरं उपलब्ध उपलब्ध आहेत आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमधील महत्त्वाच्या तारखा!

म्हाडा पुणे विभागीय मंडळ सदनिका सोडत 2020 महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज कुठे कराल - lottery.mhada.gov.in

ऑनलाईन अर्ज प्रारंभ - 10 डिसेंबर 2020 (संध्याकाळी 5 वाजल्यापासून)

ऑनलाईन अर्ज अंतिम तारीख - 11 जानेवारी 2021 (रात्री 12 पर्यंत)

अनामत रक्कम भरण्याची मुदत - 13 जानेवारी 2021

सोडत - 22 जानेवारी 2021 (सकाळी 10 पासून)

दरम्यान पुणे विभागीय मंडळाकडून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या पुणे जिल्ह्यातील गृहप्रकल्पामध्ये म्हाळुंगे मध्ये 514 घरं , तळेगाव दाभाडे (तालुुका मावळ) येथे 296 घरं, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा मध्ये 77 घरं, सांगली 77 घरं लॉटरीसाठी उपलब्ध आहेत. तसेच मोरवाडी पिंपरी (पुणे) मध्ये 87 घरं, पिंपरी वाघिरे (पुणे) मध्ये 992 घरं, तर सांगली मध्ये 129 घरं देखील या सोडतीत उपलब्ध आहेत. या सोडतीत अत्यल्प , अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी विविध घरं उपलब्ध आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील 68 भूखंड देखील या सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध असेल. अशी माहिती देण्यात आली आहे.

आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ‘म्हाडा’कडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिका नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.