MHADA Pune Board Lottery 2019: पुणे, पिंपरी चिंचवड मधील 2190 घरांसाठी सोडत निकाल आज 10 वाजता होणार जाहीर; lottery.mhada.gov.in वर पहा भाग्यवंतांची यादी!

हा निकालऑनलाईन देखील पाहता येईल.

Mhada Lottery | (Photo credit: archived, edited, representative image)

MHADA  Lottery 2019 Results:  म्हाडा च्या पुणे, पिंपरी-चिंचवड या भागातील महानगरपालिका हद्दीमधील सुमारे 2190 घरांसाठी ऑनलाईन सोडत आज (19 नोव्हेंबर) दिवशी जाहीर होणार आहे. किफायतशीर दरात सामान्यांना घरं उपलब्ध करून अनेकांच्या स्वप्नातील घर आवाक्यात आणण्यासासाठी म्हाडा राज्य भरात विविध ठिकाणी घरं बांधते. त्यापैकी पुणे शहरामध्ये घर घेण्याचं तुमचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आज तुमचं लक्ष देखील या सोडतीकडे असेल तर सकाळी दहा वाजल्यापासून त्याची सुरूवात होणार आहे.  नेहरू मेमोरियल हॉल येथे ही सोडत जाहीर होईल. तर घरबसल्या वेबकास्टिंगच्या माध्यमातूनही निकाल पाहता येणार आहे. घराचं स्वप्न पूर्ण झालेल्यांना आज एसएमएसच्या माध्यमातून निकाल कळवला जाणार आहे.  इथे पहा निकालाचं लाईव्ह स्ट्रिमिंग

कुठे बघाल म्हाडा लॉटरीचा ऑनलाईन निकाल?

www.mhada.maharashtra.gov.in

www.mhada.gov.in

lottery.mhada.gov.in

-कशी पहाल भाग्यवान विजेत्यांची यादी

>lottery.mhada.gov.in ओपन करा.

>या संकेतस्थळावर Pune Board Lottery 2019 वर क्लिक करा.

>मेन्यु बार वर तुम्हांला Lottery Result वर क्लिक करा.

>त्यानंतर लॉटरी रिझल्टची लिंक ओपन होईल.

>तुमच्या स्कीम नंबर आणि कॅटेगरीनुसार भाग्यवान विजेत्यांची आणि प्रतीक्षेत असल्याची यादी पाहता येईल.

थेट कुठे आणि कधी पासून जाहीर होईल निकाल?

नेहरू मेमोरियल हॉल, सकाळी 10 पासून

कुठल्या भागातील घरांचा समावेश असेल?

पुणे शहरातील धायरी, धानोरी, खराडी, येवलेवाडी आणि बिबवेवाडी येथील विविध गृहप्रकल्पांमध्ये या सदनिका आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत डुडूळगाव, वाकड, चिखली, मोशी, रावेत, किवळे, पुनवळे, चोवीसवाडी आणि ताथवडे येथील घरांची सोडत आज जाहीर केली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजना, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना यांचा यामध्ये समावेश आहे.

आज जाहीर करण्यात येणार्‍या घरांमध्ये 1 रूम किचन ते 3 बीएचके घरांचा समावेश आहे. भाग्यवान विजेत्यांना एसएमएस येईलच मात्र त्याच प्रमाणे आज म्हाडाच्या वेबसाईटवर देखील अर्जदारांना निकाल पाहता येणार आहे.