MHADA Lottery Aurangabad 2021 Result: म्हाडाच्या औरंगाबाद विभागातील 864 घरांसाठीच्या लॉटरीचे निकाल जाहीर
आज ऑनलाईन पद्धतीने 864 घरांसाठीच्या लॉटरीच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान या घरांसाठी 8226 अर्ज आले होते.
महाराष्ट्रामध्ये कोरोना संकट ओसरत असताना आता इतर गोष्टींना हळूहळू चालना मिळण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आज (10 जून) राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी औरंगाबाद विभागातील म्हाडाच्या घरांची ऑनलाईन लॉटरी निकाल (MHADA lottery Aurangabad) जाहीर केला आहे. आज ऑनलाईन पद्धतीने 864 घरांसाठीच्या लॉटरीच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान या घरांसाठी 8226 अर्ज आले होते. राज्य सरकारनं पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरात म्हाडाला जागा उपलब्ध करुन द्यावी. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी घरं बांधता येतील अशी मागणीही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
नव्या गृहनिर्माण धोरणात आम्ही मुंबईलगत ज्या बिल्डरांच्या जमिनी आहेत, त्यांच्यासोबत संयुक्त करार करुन म्हाडा घरं उपलब्ध करुन देणार असल्याचंही आज जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद मंडळातर्फे हिंगोली येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 132, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 48, पडेगाव-औरंगाबाद येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 368 सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील 168 सदनिका व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील 20 टक्के सर्व समावेश योजने अंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील 148 सदनिका अशा विविध उत्पन्न गटांतील एकूण 864 सदनिकांची सोडत आज पार पडली. MHADA Aurangabad Board Lottery 2021 Winners List: औरंगाबाद विभागातील 864 घरांसाठीच्या सोडतीच्या यशस्वी, प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची संपूर्ण लिस्ट पहा इथे !
इथे पहा निकाल
नक्की वाचा: Dangerous Buildings: पावसाळयाआधी मुंबईमधील अतिधोकादायक 21 इमारतींची यादी जाहीर; MHADA ने केले सर्वेक्षण (See List).
काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील 5% घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असेल अशी माहिती दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2021 05:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

