म्हाडा लवकरच महाराष्ट्रात 11 हजार घरांसाठी लॉटरी काढणार

म्हाडा (MHADA) लवकरच महाराष्ट्रात (Maharashtra) 11 हजार घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

म्हाडा महाराष्ट्रात 11 हजार घरांसाठी लॉटरी काढणार (फोटो सौजन्य-फेसबुक)

म्हाडा (MHADA) लवकरच महाराष्ट्रात (Maharashtra) 11 हजार घरांसाठी लॉटरी काढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच यंदाच्या म्हाडाच्या घरांच्या किंमती ही देखील कमी ठेवण्यात येणार असल्याचे म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले आहे.

त्याचसोबत विरार (Virar) येथील घराच्या किंमती कमी होणार असून 200 रुपये प्रति चौरस फुट असे दर लावण्यात येणार आहेत. यामुळे LIG गटामधील ग्राहकांना जवळजवळ 1 लाख रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. तर MIG गटातील ग्राहकांना 2 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. तब्बल 9500 विरारकरांना यामुळे फायदा होणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.(हेही वाचा- म्हाडा लॉटरी: मुंबई, पुणे, नाशिककरांसाठी गृहस्वप्नपूर्तीयोग, औरंगाबाद, कोकण विभागातही घरे उपलब्ध)

म्हाडा कर्मचाऱ्यांना 13-2 योजनेच्या अंतर्गच घर मिळणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे.तर काही दिवसांपूर्वीच म्हाडाने मुंबई,पुणे, नाशिक मध्ये ही घरासाठी लॉटरी काढणार असल्याचे स्पष्ट केले होते.