Kanjurmarg Metro Car Shade Issue: कांजूरमार्ग येथील मेट्रो कार शेडचा गुंता सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मध्यस्थी करणार, नवाब मलिक यांची माहिती

तर मेट्रो कारशेडला विरोध करत केंद्र सरकारने या संदर्भात न्यायालयात थेट धाव घेतली आहे.

Nawab Malik (Photo Credits: ANI)

Metro Car Shade Issue: मुंबईतील कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथील मेट्रो कार शेडवरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. तर मेट्रो कारशेडला विरोध करत केंद्र सरकारने या संदर्भात न्यायालयात थेट धाव घेतली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कार शेडचा प्रश्न सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) मध्यस्थी करणार आहे. या बद्दल मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अधिक माहिती दिली आहे.(Mumbai Metro Car Shed Project: आरे शिवाय दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा, वेळ वाया जाणार म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य्मंत्र्यांना केली 'ही' विनंती!)

मेट्रो कार शेड संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे मेट्रो कार शेड संदर्भात एकोप्याने यावर तोडगा काढला पाहिजे. यासाठीच शरद पवार यांच्याकडून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा नवा वाद अधिक पेटण्यापूर्वीच तो विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर येत्या दोन दिवसात शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत या मेट्रो कार शेड संदर्भात चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवाब मलिक यांनी यावेळी नाव न घेता विरोधकांवर ही टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले की, मेट्रो कार शेडच्या कामात काही जण राजकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.(Mumbai Metro Car Shed Project: कांजुर जागेचा वाद चर्चेतून सोडवायला पुढे या; विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कार शेड संदर्भात असे म्हटले की, मी या प्रकल्पासाठीचे क्रेडिट विरोधी पक्षाला द्यायला तयार आहे. यामध्ये कोणताच अहंकार नाही आहे. फक्त हा प्रश्न चर्चा करुन सोडवावा अशी अपेक्षा आहे. त्याचसोबत मेट्रो कार शेडसाठी वापरण्यात येणाऱ्या जागेचे कागपत्र राज्य सरकारकडे आहेत. त्यामुळे आम्ही सिद्ध करु शकतो की जमिन ही राज्य सरकारची आहे. पण जमिनीच्या मालिकाचा वाद असल्यास तो चर्चा करुन आपण मिटवू असे ही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.