Pune Drugs Case: पुण्यात 2 कोटींची दारूसह 12 लाखांची मेफेड्रोन जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

गुरुवारी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाने गोव्यात बनवलेली 2 कोटी रुपयांची अवैध दारू जप्त केली. दोन ट्रकमध्ये दोन हजार पेट्या अवैध दारू आणली जात होती. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

Pune Police | (Photo Credits: ANI)

थर्टी फर्स्ट नाईट (Thirty First Night) आणि न्यू इयर पार्ट्यांच्या (New Year Party) आधी महाराष्ट्रात विविध ठिकाणी अमली पदार्थ (Drugs) आणि अवैध दारूचा धंदा वाढला आहे. गुरुवारी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाने गोव्यात बनवलेली 2 कोटी रुपयांची अवैध दारू जप्त केली. दोन ट्रकमध्ये दोन हजार पेट्या अवैध दारू आणली जात होती. याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई करताना 11 लाख रुपये किमतीचे म्याव- म्याव म्हणजेच मेफेड्रोन (Mephedrone) ड्रग्जही जप्त केले आहे. मुंबई पोलिसही अशा कारवाया आणि पार्ट्यांवर लक्ष ठेवून आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाच्या युनिट 2 च्या कारवाईत येरवडा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीकडून 11 लाख रुपये किमतीचे 53.08 एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याच्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील रेल्वे स्थानकाजवळ 12 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हेही वाचा Nashik Crime: प्रेयसीसमोर शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तरुणाचा महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, आरोपीस अटक

तस्कर मोहम्मद फारूख आणि मोहम्मद उमर टाक या मूळचे राजस्थान या दोघांना अटक करण्यात आली होती. पालघरमध्येही दमणमध्ये बनावट दारूची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे ही बातमी कोणत्याही रेव्ह पार्टी किंवा अशा न्यू इयर पार्टी किंवा थर्टी फर्स्ट नाईट सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी सूचना म्हणून महत्त्वाची आहे, विशेषत: मुंबई आणि पुणे पोलिस अशा घटनांवर लक्ष ठेवून आहेत. मुंबई पोलीस साध्या गणवेशात अशा पार्ट्यांना हजेरी लावतात.

शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या जंक्शनवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. जो कोणी ड्रग्ज वापरताना आढळून आला, त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. विशेषत: 31 डिसेंबर रोजी मुंबई पोलिसांकडून 25 डीसीपी, 7 अतिरिक्त आयुक्त, 1500 अधिकारी, 10,000 कॉन्स्टेबल, 46 एसआरपीएफ प्लाटून आणि 15 क्यूआरटीची टीम वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस ड्रग्जविरोधातील मोहिमेत चांगलेच सक्रिय झाले आहेत. हेही वाचा Thane: मटन शॉपमधून 12 बोकड चोरीला, थर्टी फर्स्टच्या तोंडावर दुकानदारास भुर्दंड; गुन्हा दाखल

2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुंबई पोलिसांनी 4928.66 कोटी रुपयांचे 4036 किलो ड्रग्ज जप्त केले. यादरम्यान मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने 708 गुन्हे दाखल केले असून 844 जणांना अटक केली आहे. यापूर्वी 2021 मध्ये 594 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. 151 कोटी रुपयांचे 4050 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले असून 776 जणांना अटक करण्यात आली आहे. आता थर्टी फर्स्ट नाईटपूर्वी मुंबई पोलिसांनी दक्षता वाढवली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now