महाराष्ट्र राज्य नोकरभरती : 72 हजार पदे, जाणून घ्या कोणत्या विभागात किती जागा?

येत्या आठवडाभरात या भरतीच्या जाहिराती निघणार आहे. तर मेगाभरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाणार आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo credit : PTI)

मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना, राज्यात होणारी नोकरभरती स्थगीत करण्यात आली होती. मात्र आता या मेगाभरतीबाबत एक खुशखबर आहे, राज्यात ही नोकरभरती आता पुन्हा सुरू होणार आहे. सरकारी सेवेतील तब्बल 72 हजार पदांसाठी ही भरती होणार आहे. येत्या आठवडाभरात या भरतीच्या जाहिराती निघणार आहे. तर मेगाभरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाणार आहे. ही भरती प्रत्येक विभागनिहाय होणार असून याबाबत प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मेगाभरतीची महत्वाची घोषणा केली होती. महसूल, कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह, जलसंधारण, वित्त अशा विविध विभागांमध्ये ही मेगाभरती होणार आहे. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी सर्व पदांसाठी होणारी परीक्षा पार पडेल.

कोणत्या खात्यात किती जागा?

आरोग्य खाते – 10,568

गृह खाते – 7,111

ग्रामविकास खाते – 11,000

कृषी खाते – 2500

सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337

नगरविकास खाते – 1500

जलसंपदा खाते – 8227

जलसंधारण खाते – 2,423

पशुसंवर्धन खाते – 1,047

दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात मृत्यू पडलेल्या युवकांच्या कुटुंबातील वारसांना परिवहन विभागामध्ये नोकरी देण्यात येणार आहे. 26 जानेवारीपासून या वारसांना प्रत्यक्षात नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे. त्यांची ही नोकरी कायमस्वरूपी असणार असून त्यांना तातडीने नियुक्‍तीपत्रे देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे.