Mega Block 8th December 2019: मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक जाणून घ्या वेळापत्रक
यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहतील तर अन्य ठिकाणी लोकलचा उशिराने धावणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.
मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे सह ट्रान्स हार्बर मार्गांवर विविध तांत्रिक कामानिमित्त आज 8 डिसेंबर रोजी सकाळपासून मेगाब्लॉकचे (Megablock) नियोजन करण्यात आले आहे. यामुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहतील तर अन्य ठिकाणी लोकलचा उशिराने धावणार असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून बाहेर जावे. तर प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मुख्य मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात आलेला नाही.
परंतु ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, पनवेल या दरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्याचसोबत सांताक्रुझ ते माहिम दरम्यान जलद मार्गावर दुरुस्तीचे काम सुरु राहणार आहे. या मार्गांवरील ब्लॉक सकाळी 10.35 ते 3.35 वाजेपर्यंत असणार आहे. यामुळे जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गाने वळवण्यात येणार आहे. सांताक्रुझ ते माहिम दरम्यान रेल्वे रुळांवर काम करण्यात येणार आहे. परिणामी वांद्रे लोकल आणि खार रोड दरम्यानचे गेट ब्लॉकवेळी बंद राहणार आहेत.(मध्य रेल्वेचं 14 डिसेंबरपासून नवं वेळापत्रक जाणून घ्या)
Central Railway Tweet:
ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यान सकाळी 10.35 ते 04.07 वाजेपर्यंत ब्लॉक सुरु राहणार आहे. त्यामुळे पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून ठाण्याला जाणाऱ्या लोकल 10.45 ते 03.38 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु प्रवासी मुख्य मार्गिकेवरुन आणि हार्बर मार्गावर प्रवास करु शकतात.