Jalna News: आरोग्य कॅम्प लावण्यासाठी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घेतली लाच, जालन्यातून दोघांना अटक
पोलिसांना लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना ताजी असताना जालना जिल्ह्यात आरोग्य कॅम्प लावण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
Jalna News: पोलिसांना लाच घेताना रंगेहात पकडल्याची घटना ताजी असताना जालना जिल्ह्यात आरोग्य कॅम्प लावण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जिल्ह्यातील अबंड येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आवारात वैद्यकिय अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक संभाजीनगर विभागाच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- सूने बद्दलचा राग मुलावर काढला, अंगावर फेकले उकळते पाणी,
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्र वडिगोद्री आणि जामखेड केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आहेत. तक्रादार यांनी त्यांच्या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये मानव विकास अंतर्गत घेतलेल्या आरोग्य शिबिराची बिले पडताळणी करून मंजुरी करिता पंचायत समिती अंबड येथे पाठवण्यात आले होते. त्यावेळी आरोग्य अधिकारीच लाच घेत होते. त्यानंतर या घटनेची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांनी संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
घटनास्थळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी आले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेने आरोग्य विभागातील एकच खळबळ उडाली आहे. डॉ. शामकांच दत्तात्रय गावंडे आणि कनिष्ठ सहाय्यक पंडित भीमराव कळकुंबे असं आरोपींचे नाव आहे. आरोग्य कॅम्पसाठी एक हजार रुपय या प्रमाणे २५ कॅम्पसाठी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. दोघांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. विशेषता दोघांना रंगेहात पकडले आहे.