भायखळा राणी बाग बंगल्यात महापौरांचे लवकरच स्थलांतर होणार

तर ऐतिहासिक बंगल्यात आता शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे (Bal Thackeray) स्मारक उभारण्यात येणार आहे.

महापौर बंगला शिवजी पार्क (फोटो सौजन्य-ट्वीटर)

शिवाजी पार्क येथील पुरातन वास्तु असलेल्या महापौर बंगल्याचा निर्णय अखेर घेण्यात आला होता. तर ऐतिहासिक बंगल्यात आता शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे (Bal Thackeray) स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे भूमिपूजन पुढील आठवड्यात असल्याने महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांनी भायखळा राणी बाग बंगल्यात जाण्याची तयारी सुरु केली आहे.

महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महापौरांच्या निवासस्थानाचा प्रश्न उपस्थित राहिला होता. त्यामुळे मुंबईचे प्रथम नागरिक म्हणून त्यांची प्रतिष्ठा जपली जाईल असा बंगला असला पाहिजे असे सांगितले जात होते. तर पालिकेच्या या मागणीकडे राज्य शासनाने दाद न देता अखेर राणी बाग येथील बंगल्यात महापौरांच्या निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. (हेही वाचा- भायखळाच्या राणी बाग बंगल्यात राहण्याचा महापौरांचा निर्णय निश्चित)

येत्या 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर महापौरांच्या परिवाराकडून राणी बागेतील बंगल्याची सुधारणा करण्यात यावी असे सांगितले होते. त्यामुळे आठवड्याभरातच महापौर विश्वनाथ महाडेश्वर राणी बागेतील बंगल्यात राहण्यास जाणार आहेत.



संबंधित बातम्या

West Indies vs Bangladesh, 2nd T20I Match Live Streaming In India: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात रंगणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या भारतात थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहाल

NZ vs ENG, 3rd Test Match Day 2 Preview: इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारू शकतील का? की न्यूझीलंडचे गोलंदाज कहर करणार, दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी बॅटल आणि लाइव्ह स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील घ्या जाणून

Dadar Railway Station: दादरमधील 5 मंदिरांना पाडण्याबाबत नोटीस; मध्य रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावरून राजकारण तापले

Tim Southee Retirement: निवृत्तीनंतर टीम साऊदी झाला भावूक, मुलीला कडेवर घेऊन उतरला मैदानात; शानदार कारकिर्दीचा शेवट (Watch Video)