Dombivli: सत्यणारायण महापूजा आणि हळदीकुंकू कार्यक्रमास विरोध; डोंबिवली येथे मराठी विरुद्ध अमराठी वाद

डोंबिवली येथे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उफाळून आला आहे. सोसायटीमध्ये मराठी जणांनी आयोजित केलेल्या सत्यणारायण महापूजा आणि हळदीकुंकू कार्यक्रमास विरोध केल्याने हा वाद उफाळला आहे.

Dombivli: सत्यणारायण महापूजा आणि हळदीकुंकू कार्यक्रमास विरोध; डोंबिवली येथे मराठी विरुद्ध अमराठी वाद
Dombivli Haldi Kunku Controversy | (Photo Credit- X)

ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी ( Marathi vs Non Marathi) असा संघर्ष उफाळून आला आहे. घटना आहे डोंबिवली (Dombivli) येथील नांदीवली परिसरातील एका सोसायटीतील आणि निमित्त ठरले आहे, आयोजित करण्यात आलेली सत्यनारायण महापूजा (Satyanarayan Mahapuja) आणि हळदीकुंकू कार्यक्रम (Haldi Kunku Program). सोसायटीतील मराठी जणांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सोसायटीतील अमराठी समूहाने तीव्र विरोध केला. प्रकरण इतके वादग्रस्त बनले की, शेवटी पोलिसांमध्ये तक्रार झाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मध्यस्थी केली खरी. मात्र, गोंधळ व्हायचा तो झाला. सदर घटना 27 जानेवारी रोजी घडली. घटनेचा तपास पोलिसांकडून अजूनही सुरुच आहे.

स्थलांतरितांमुळे सांस्कृतिक संघर्षात वाढ

पाठिमागील काही काळापासून नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पनवेल आदी ठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी असा वाद अनेकदा उफाळून आला आहे. यामध्ये कधी अमराठी टोळक्याने मराठी कुटुंबीयांना केलेली मारहाण असो की, मराठी कार्यक्रमांना केलेले विरोध किंवा समस्त मराठी माणसाबद्दलच काढलेले अनुद्गार असोत. एक ना अनेक घटनांमुळे सांस्कृतिक संघर्ष अधिक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. अशीच घटना डोंबिवली येथील नांदिवली परिसरात असलेल्या साई कमल छाया इमारतीत घडली. या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी 2 फेब्रुवारी रोजी सत्यणारायण महापूजा आणि हळदीकुंकू आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यासाठी सोसायटी आवारात फलकही लावण्यात आले. दरम्यान, प्राप्त माहिती अशी की, सोसायटीत राहणाऱ्या काही अमराठी कुटुंबीयांनी सोसायटी व्हॉट्सअॅप ग्रुपवर कार्यक्रमास कथीतरित्या विरोधत केला आणि कार्यक्रमाचे फलकही काढले. त्यावरुन दोन्ही समूहामध्ये तीव्र संघर्ष झाल्याचा दावा मराठी कुटुंबातील महिलांनी केला. दरम्यान, या घटनेनंतर सोसायटीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील परुष मंडळी आक्रमक झाली असून, त्यांनी अमराठींकडून केला जाणारा हा विरोध खपवून घेतला जाणार नसल्याचे म्हटले. (हेही वाचा, Dombivli Urine Case: पिशवीत लघवी करणाऱ्या तरुणावर कारवाई; डोंबिवली येथील घटना, Video Viral)

पोलिसांना करावी लागली मध्यस्थी

ठाणे: मराठी विरुद्ध अमराठी वादाचा केंद्रबिंदू?

अलिकडील काही काळात मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. खास करुन नवी मुंबई, पनवेल, ठाणे, पालघर, वसई, विरार अशा ठिकाणी हे संघर्ष अधिक होत आहेत. खास करुन ठाणे हा महाराष्ट्रातील असा जिल्हा आहे, जेथे सर्वाधिक स्थलांतर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या जिल्ह्यात विविध जिल्हे आणि राज्यांतून आलेले सर्वाधिक स्थलांतरीत राहतात असा अभ्यास सांगतो. परिणामी ठाणे हा मराठी विरुद्ध अमराठी वादाचा केंद्रबिंदू? ठरतो आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).