Marathi Rajbhasha Din 2023: मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देत राज ठाकरेंचं मराठी बांधवांना साद; 'अभिजात भाषेचा' दर्जा मिळावा यासाठी मनसेला साथ द्या

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार याकडे मराठीप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Raj Thackeray | (Photo Credit - Social Media/MNS)

मराठी भाषा गौरव दिन आज 27 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधत मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली आहे. आता मराठी जनांची आपल्या भाषेला 'अभिजात भाषेचा दर्जा' मिळावा ही मागणी आहे. आज मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा मराठी बांधवांना साद घातली आहे. मराठी भाषेच्या अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करु. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ द्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

पहा ट्वीट



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif