Dr. Mangala Narlikar Passed Away: मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

मंगला नारळीकर यांची अध्यापकीय कारकीर्द मोठी राहिली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च (मुंबई), केंब्रिज विद्यापीठात , मुंबई आणि पुणे विद्यापीठ (सध्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ) आदी नामवंत संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन आणि संशोधनाची जबाबदारी पार पाडली आहे.

Dr-Mangala Narlikar | (File Image)

Dr. Mangala Narlikar Work and Research: भारतीय गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झाले आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या. पाठीमागील प्रदीर्घ काळापासून त्या कर्करोगाच्या दुर्धर अजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मधल्या काळात त्यांनी आपल्या असाध्य आजारावर वैद्यकीय उपचारांनी मातही केली होती. मात्र, अखेर त्यांना मृत्यूने गाठलं. सकाळी 5.30 च्यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 11.30 च्या दरम्यान वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने एक मराठी गणितज्ज्ञ हरपला आहेच. परंतू, त्यासोबतच एक लेखिका (Mangala Narlikar Books), शिक्षिका, विज्ञाननिष्ठ विचारवंत आणि संशोधकही आपण गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

मंगला यांनी प्रसिद्ध शास्ज्ञज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी विवाह केला. तत्पूर्वी त्या मंगला राजवाडे नावाने ओळखल्या जात. 17 मे 1943 रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून त्यांनी 1962 मध्ये बीएची पदवी संपादन केली. पुढे गणित विषयात त्या एम ए झाल्या. ते साल होते 1964. विशेष म्हणजे त्या परीक्षेत विद्यापीठामध्ये प्रथम आल्या होत्या. त्यामुळे त्यांना तत्कालीन कुलपतींकडून सुवर्णपदक मिळाले होते. त्या काळात हा मोठा बहुमान समजला जात असे.

डॉ. मंगला नारळीकर यांची अध्यापकीय कारकीर्द मोठी राहिली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च (मुंबई), केंब्रिज विद्यापीठात , मुंबई आणि पुणे विद्यापीठ (सध्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ) आदी नामवंत संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन आणि संशोधनाची जबाबदारी पार पाडली आहे. 1974 ते 1980 या काळात त्यांनी प्राध्यापक के. रामचंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा इन्स्टिट्युटल येथे संशोधन करुन गणित विषयात पदवी मिळवली. (हेही वाचा, ठरलं! 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड)

डॉ. मंगला नारळीकर यांनी अध्यापन, संशोधनासोबतच विविध विषयांवर पुस्तकेही लिहीली आहेत. त्यातील बहुतांश पुस्तके ही विज्ञानावर आधारीत आहेत. याशिवाय त्यांनी विविध संशोधन करुन काही रिसर्च पेपरही प्रसिद्ध केले आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या संशोधन आणि वैज्ञानिक अभ्यास करणाऱ्या वर्तुळाला मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे मार्गर्शन अनेकांसाठी मोलाचे राहिले आहे.